शेतकऱ्यांनो काठीण परिस्थितीत मनामध्ये आत्महत्येची भावना आणू नका ; कृषीमंत्री

कृषीमंत्री अनिल बोंडे

मान्सून नसल्याने शेतकऱ्यांवर कठीण वेळ ओढावली आहे. या संकटाचा सामना आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे केला पाहिजे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र सरकारने यशस्वीरित्या कर्जमाफी योजना राज्यात राबविली आहे. कृषिसंकट राज्यावर ओढावलं आहे ही खरी परिस्थिती आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आत्तापर्यंत 19 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. उर्वरित रक्कम येणाऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे असा दावा राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिला आहे.

तसेच दुष्काळाच्या संकटावर मात करत असताना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मनामध्ये आत्महत्येची भावना आणू नका असं आवाहन कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केले.

सरकारने शेतकऱ्यांकरिता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसित करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टल मध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. यासंदर्भात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांची भेटही घेण्यात आली होती.

मोठी बातमी – तूरडाळीच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

शेतकऱ्यांना कृषी योजनांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसीत