ओरडता कशाला, जे स्वस्त आहे तेच खा ; सदाभाऊ खोतांनी उधळली मुक्ताफळे

टीम महाराष्ट्र देशा: कांदा, आलूचे भाव वाढले की ओरड होते. या वस्तूंचे भाव वाढले तरी इतर भाजीपाला स्वस्त आहे ना ! ते काय अॅटमबॉम्ब आहेत? लोकं त्या का खात नाहीत, अशी मुक्ताफळे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उधळली. कारंजा येथे मंगळवारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

दरम्यान, माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे राजू शेट्टी यांचा हात होता. हल्लेखोर तिघांचा सत्कार करून त्यांनी हे सिद्ध केले आहे. राजू शेट्टी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी दोन निवडणुकीत त्याचे राजकारण केले. त्यांच्यावर हल्ला झाला तर निषेध आणि माझ्यावर झाला तर सत्कार. शेट्टी यांची ही भूमिका दुटप्पीपणाचीच नव्हे तर अतिरेकी स्वरुपाची आहे, अशी टीका कारंजा पंचायत समितीच्या आवारात आढावा बैठकीनंतर सदाभाऊ खोत यांनी केली.