मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये : रामदास आठवले 

टीम महाराष्ट्र देशा- एका गावात मराठ्यांचे दोन गट असतात त्यातला एक गट दुसऱ्या गटावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतो. मग ज्याच्यावर केस झाली त्या गटाला हा कायदा त्याला चुकीचा वाटतो. त्यामुळे मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. आठवले यांनी आज पत्रकारांशी पुण्यात संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोकठोक मतं व्यक्त केली.

दरम्यान, मराठा समाज्याच्या मोर्च्यांची चर्चा जगभर झाले.मात्र आता ते आंदोलन हिंसक होऊ लागले आहे.त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत.मी गेली 25 वर्षे मराठा आरक्षणाची मागणी करत आहे तसेच आगामी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

द.म.मुंबईतून निवडणूक लढवणार

लोकसभेत रिपब्लिकन पक्ष असायला हवा त्यामुळे मी द.म.मुंबईतून निवडणूक लढवणार असून खासदार शेवाळे यांना आमदारकी द्या, मंत्रिपद द्या मात्र मला ती जागा सोडलीच पाहिजे असा माझा आग्रह असणार आहे. युती नाही झाली तर मी भाजप आर पी आय चा उमेदवार असेल , पालघर ची जागा सोडून म.द ची जागा द्यावी.

हे सरकार दलितांच्या हिताची भुमिका घेणारे-रामदास आठवले