कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

शेतकरी

वर्धा – गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मॉन्सून देखील आले. निसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते. सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

मात्र, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने वर्ध्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.

अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे, आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत, असेही कृषी विभागाने सांगितले आहे.

दुसरीकडे लातूर जिल्ह्यात देखील अजून म्हणावा तेवढा पाऊस जिल्ह्यात झाला नाहीये त्यामुळे अजून तरी पेरणी करू नये, असे आवाहन लातूर जिल्ह्यातील कृषि विभागाने दिले आहे.

कृषि विभागाकडून असे आवाहन करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील सर्व कृषि बांधवांना कळविण्यात येते की, जिल्ह्यामध्ये शुक्रवारी दि. १० जून रोजी अखेर ५५.२ मीमी सरासरी पाऊस झालेला असुन अद्यापही पेरणी योग्य पाऊस पडलेला नाही. कृषि विद्यापिठाने किमान ८० ते १०० मीमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये अशी शिफारस केलेली आहे. ८०-१०० मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते.

तसेच शेतकऱ्यांना किमान आणखी २ मोठे पाऊस झाल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. कारण जेवढा पाऊस सध्या झाला आहे त्यामुळे पिकांसाठी तसेच पेरणीसाठी लागणारा ओलावा आणखी तयार नाही झालेला. त्यामुळे अनेकवेळा कमी ओळव्यावर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते, त्यामुळे ८०-१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या –