मोदी सरकारमध्ये काम करू इच्छित नाही अधिकारी?

मोदी सरकार

केंद्रात काम करण्यासाठी अधिकारी अनुत्सुक असल्याचं सांगत कार्मिक मंत्रालयानं राज्यांकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मागवले आहेत. ज्यांना भविष्याच पुढे जायचं आहे आणि ज्यांच्याकडे चांगला अनुभव आहे, अशा अधिकाऱ्यांचं प्रतिनियुक्तीवर आदान-प्रदान करण्यात यावं, असा प्रस्तावही केंद्रानं राज्य सरकारांना दिला आहे. कार्मिक मंत्रालयानं राज्यांना पत्र पाठवून म्हटलं आहे की, 2019च्या भरतीसाठी अर्ज मागवून सहा महिने झाले आहेत. आतापर्यंत म्हणावे तसे अर्ज आलेले नाहीत.

खासकरून उपसचिव/संचालक स्तरावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या योजनेंतर्गत विविध विभागांत अधिकाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याचंही केंद्रानं निदर्शनास आणून दिलं आहे. या पत्रात केंद्रीय कर्मचारी योजनेंतर्गत उपसचिव/संचालक/संयुक्त सचिव स्तराच्या अधिकाऱ्यांची मोठी संख्येनं नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जेणेकरून इतर केंद्रीय अधिकाऱ्यांसाठी प्रतिनियुक्ती/राखीव प्रतिनियुक्तीचा वापर करता येईल.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Budget 2019 : झीरो बजेट शेतीवर आमचा भर – सितारामन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटी रुपये मंजूर

साखर उद्योगाला सरकारनं मदत करणं अशक्य आहे; पर्यायाचा विचार करा – गडकरी

Loading...