चेहऱ्यावरील मुरूम (पिंपल्स) जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

पिंपल्स

मुरमांमुळे त्वचा खडबडीत होते. सौंदर्यावर त्यामुळे डाग पडतो. चारचौघात जाणेही त्रासदायक वाटते. मुरम कोणत्याही वयात होऊ शकतात. तेलकट त्वचेच्या लोकांना मुरमाचा त्रास जास्त होतो. त्यातही उन्हाळ्यात याचे प्रमाण आणखी वाढते. मुरम कमी करण्याचा प्रयत्न केल्यास ते वाढतातही. चला तर जाणून घेऊ उपाय..

घरगुती उपाय –

  • खूप टॉमॅटो खाल्ले पाहिजे, पण ते पिकलेले पाहिजे. टॉमॅटो खाल्ल्याने त्वचेला ग्लो येतो. त्यात खूप सारे एंटीऑक्साडेंट आहे.
  • चेहऱ्यावर पूरळ किंवा मुरूमांची समस्या होऊ नये असे वाटत असेल तर तुमची झोप होणे गरजेचे आहे. चांगला आहार आणि चांगली लाइफ स्टाइल तुमची मुरूमांपासून कायमची सुटका करू शकते.
  • गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहर्‍यावरील छिद्रे खुली होतात आणि चेहरा साफ होतो. मुरूम व्हायला त्यामुळे अटकाव होतो.
  • तुमच्या त्वचेला चांगले ठेवायचे असेल तर खूप पाणी प्यायले पाहिजे. यामुळे नेहमी त्वचा हायड्रेट राहते आणि शरीरात रक्ताचा फ्लो कायम राहतो. पाण्याशिवाय असे फळ किंवा बाज्या करू शकतात, की ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे. दिवसात तुम्ही ८ ग्लास पाणी प्यायला पाहिजे.
  • गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्याने मुरूम कमी होतात.

महत्वाच्या बातम्या –