मैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय ? हे नक्की वाचा

आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आहारात रोज थोडे का होईन मैद्याचे प्रमाण असते. मैद्यापासून बनलेले अनेक पदार्थ स्वादिष्ट लागतात. उदा- बिस्कटे, ब्रेड, समोसा,केक,रोटी, नान इत्यादी. पण तुम्हांला माहिती आहे का अति प्रमाणातील मैद्याचे आणि मैद्याच्या पदार्थचे सेवन हे तुमच्या आरोग्यस घातक ठरू शकते. मैदा आणि मैद्याचे पदार्थ हे कश्या प्रकारे आरोग्यस घातक ठरू शकतात हे आपण पाहणार आहोत..

अंडी का खावीत ? जाणून घ्या फायदे

  • जास्त प्रमाणात मैदा सेवन केल्याने शरीराचे वजन वाढून लठ्ठपणा वाढतो एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.
  • मैदा नियमित खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते. वारंवार आजारी पडण्याची शक्‍यता असते.
  • मैदा हा पचायला जड असतो त्यामुळे मैद्याच्या आणि त्या पासून बनलेल्या पदार्थच्या सेवनाने पचनविषयक समस्या निर्माण होतात.
  • मैद्यात ग्लुटन असतं. गव्हाच्या पिठात मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन असतं. मैद्यात हे दोन्ही नसतात. मैदा फुड ऍलर्जी तयार करतं.
  • मैदा बनविताना सोडीयम मेटा बिसल्फेट आणि बेंझॉइक ऍसिडचा उपयोग केला जातो. जे गरोदर महिला आणि लहान मुलांना अपायकारक आहे.
  • मैद्यात फायबर नसल्यानं पोट नीट साफ होत नाही. कॉन्स्टिपॅशनचा त्रास जाणवतो.
  • मैद्यात खूप प्रमाणात स्टार्च असतं. याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईडची पातळी वाढते.
  • मैदा शरीरासाठी एक स्लो पॅशन सारखा आहे. मैद्याच्या ऐवजी आपण नाचणी, गहू, बाजरी, ज्वारी पीठाचा उपयोग करून विविध पदार्थ तयार करू शकतो.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात 100 तर जिल्ह्यात 50 ऊस कापणीसाठी हार्वेस्टर मशिन्स बुक

तुम्हाला सतत चहा पिण्याची सवय आहे, तर मग चहामध्ये ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक……..