आयुर्वेदात उन्हाळ्यात बेलाच्या फळाचे सेवन शरीरासाठी लाभदायक असते. बेलाच्या फळाच्या फायद्याविषयी क्वचितच लोकांना माहित असेल. काही लोकांना बेल केवळ महादेवाला अर्पित करण्यासाठी वापरले जाते एवढेच माहित आहे. त्यामुळे याच्या फळाचा फायदा खूप कमी लोकांना माहित आहे. परंतु बेलाचे फळ औषधी म्हणून वापरले जाते.
बेलाच्या फळामधी 100 ग्रॅम रसाळ भागात 61.5 टक्के आर्द्रता, चरबी 3 टक्के, प्रोटीन 1.8 टक्के, फायबर 2.9 टक्के, कार्बोहायड्रेट 31.8 टक्के, कॅल्शिअम 85 मिलीग्रॅम, फॉस्फोरस 50 मिलीग्रॅम, आयर्न 2.6 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन सी 2 मिलीग्रॅम, शिवाय बेलामध्ये 137 कॅलरी उर्जी आणि काही प्रमाणात व्हिटॅमिन बीसुध्दा आढळते.
चला तर जाणून घेऊ फायदे…..
- डिहाड्रेशन झाल्यास बेलाचे ताजे पाने वाटून मेंदीसारखे पायाच्या तळव्यावर लावावे, शिवाय माथ्यावर, छातीवरसुध्दा मालिश करावी. मिश्री टाकून बेलाच्या फळाचे शरबत प्यायल्यास त्वरित आराम मिळतो
- बेलामध्ये लेक्साटीव्हचा स्तर अधिक असतो. ते शरीरामध्ये रक्ताची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते. शरीरात इन्सुलिन बनवण्यासाठी बेल सर्वाधिक मदत करते. यामुळे मधूमेहाला आराम मिळतो.
- ज्यांची स्मरणशक्ती कमी आहे अशांनी बेलाची पाने नियमित खाल्ली तर त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
- पोटाच्या समस्यांसाठी बेलाचे फळ रामबाण आहे. बेलाचे शरबत प्यायल्यास बद्धकोष्ठता मूळापासून नष्ट होते.
महत्वाच्या बातम्या –
- कोरोनाची लस आल्यावर सर्वात आधी कुणाला मिळणार ?
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता
- ‘पुदिना’ वनस्पतीचे काय आहेत रामबाण उपाय घ्या जाणून……
- नोकरीच्या मागे न लागता शेतीत केला अभिनव प्रकल्प; तरूणाईसाठी प्रेरणादायी