सोयाबीनचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

कडधान्य, पालेभाज्या, डाळी यांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक फायदे साऱ्यांनाच ठाऊक आहेत. परंतु, सोयाबीन हादेखील असाच एक पदार्थ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक शाकाहारी लोकं सोयाबीनची भाजी आवडीने खातात. तर, महिलादेखील गहू किंवा अन्य धान्यांमध्ये सोयाबीन टाकून त्याचं पीठ करुन आणतात. सोयाबीनच्या सेवनाने अनेक शारीरिक व्याधी दूर होत असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे सोयाबीनच्या बी प्रमाणेच त्याची अन्य उत्पादनांचादेखील शरीरासाठी तितकाच फायदा होतो. चला तर जाणून घेऊ फायदे…..

  • सोयाबीनच्या सेवनाने शरीरात अॅस्ट्रोजन निर्माण होते जे सुरकुत्या दूर कऱण्यास मदत करते.
  • सोयाबीनच्या नियमित सेवनाने नखे कमकुवत होण्याची समस्याही दूर होते.
  • सोयाबीनची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. यासाठी सोयाबीन पाण्यात भिजवा. त्यानंतर याचे बारीक मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
  • . केस लांब, घनदाट वा काळेभोर हवे असतील तर सोयाबीनचे नियमित सेवन करा. सोयाबीनमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे केस काळेभोर आणि घनदाट होतात.
  • हडांना बळकटी देण्यासाठी आणि मजबूती वाढविण्यासाठी सोयाबीन फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या –