सातबारा उतारा (Satbara Utara) म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स). या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात. यापैकी ‘गावचा नमुना’ नं ७ आणि ‘गावचा नमुना’ नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात.
सात बाराचा उतारा म्हणजे जमिनीची इत्यंबूत माहिती . आपण सात बाराचा उतारा वाचला तर प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, जमिनीबाबतचा सर्व तपशील, दुवे , लहान सहान माहिती आपणास कळू शकतो. सात बाराच्या उताऱ्यावरून आपणास
- जमिनीचा भूमापन क्रमांक,
- गावाचे नाव,
- जमिनीचे क्षेत्रफळ,
- जमिनीचा भूतकाळ
- वर्तमानकाळातील मालकी याविषयची माहिती मिळू शकते.
प्रत्येक गावचा तलाठी गाबातील सर्व जमिनींच्या संदर्भात वेगवेगळ्या नोंदणी वह्या ठेवत असतो. या नोंदणी वह्यांना (रजिस्टर) वेगवेगळे अनुक्रमांक दिलेले आहेत
७/१२ उतारा काय दर्शवितो?
प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा उताऱ्यावरून कळू शकते. ‘गाव नमुना ७’ हे अधिकारपत्रक आहे व ‘गाव नमुना १२’ हे पीक-पाहणी पत्रक आहे. जमीन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे ‘गाव नमुने’ असतात. बालाजी सातबारा उताऱ्याच्या अगदी वर गाव,तालुका,जिल्हा इत्यादी नमूद केलेले असते. ७/१२ हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो. ७/१२ ची नविन पुस्तके साधारणता १० वर्षानी लिहिली जातात. ७/१२ पीक पाहनी नोंद दर वर्षी केली जाते.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकर्यांसाठी केंद्र सरकारने सुरु केल्या आहेत ‘ह्या’ ६ महत्वाच्या योजना
- हवामान अंदाज – आजपासून पुढील 2 दिवस ‘या’ भागात थंडीची लाट येणार
- कृषी पंप वीज थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे होणार – दत्तात्रय भरणे
- थंडीची हुडहुडी; राज्यात २ ते ३ दिवस थंडीचा कडाका वाढणार
- पावसाचा नवा विक्रम: १२२ वर्षानंतर पाहिल्यांदाज ‘या’ भागात पडला ८८.२ मिलीमिटर पाऊस
- Budget २०२२: यंदाच्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याची शक्यता
- साधारण खोकला म्हणून दुर्लक्ष करत असाल तर ठरू शकते जीवघेणे : वाचा सविस्तर.