नांदेड – लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात परतीच्या पावसानं प्रचंड हाहाकार उडवला. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक शेतमाल पुरात वाहून गेला, तर शेतात उभी असलेली पिकं सडून गेली. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळी दौरे करत आहेत.
दरम्यान, परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आता सरकारमधील मंत्री मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पोहोचत आहेत. मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार आज नांदेड दौऱ्यावर आहेत. मात्र, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना विजय वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
मुखेड तालुक्यातील सलगरातील शेतकऱ्यांनी वडेट्टीवारांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली. पाहणी दौरे थांबवा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शासनाप्रती बळीराजाच्या मनात असणारा रोष किती तीव्र आहे याचा प्रत्यय आल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्याकडची नाणी विकून होऊ शकता लखपती
- प्रत्येक मंदिरासमोर कासव का असते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या!
- रोज एक सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या
- केसांमधील कोंडा घालवण्यासाठी ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या