तुळशीचा चहा पिणे आरोग्यासाठी आहे फायदेशीर!

तुळशीचा चहा

तुळशी ही घरातील जणू एक सदस्य असते. कारण दरवर्षी तुळशीचा केला जाणारा तुळशीविवाह. तुळशी सेवन करण्याचे अनेक उपयोग असतात; पण तुळशीच्या नुसत्या असण्यानेही हवा शुद्ध होते, जंतूंचा नायनाट होतो हे सिद्ध झालेले आहे. तुळशीची पाने, बिया व मुळे ही औषधात मुख्यत्वे वापरली जातात. तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे तुळशी अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधील सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली की लगेच कामाला लागते. त्यामध्ये एक महत्वाचे म्हणजे तुळशीचा चहा. तुळशीचा चहा अनेक रोगांवर रामबाण औषध आहे. पण तुळशीचा चहा बनवताना तो ताज्या पानाचा बनवावा.

चला तर मग जाणून घेऊयात तुळशीचा चहा (Basil tea) पिण्याचे फायदे –

  • तुळशीचा चहा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व यामुळे आजार दूर राहतात.
  • तुळशीमध्ये अँटी इंफ्लेमेंटरी हा गुण आहे त्यामुळे हा चहा सांधूदुखीला दूर ठेवतो.
  • तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळयांची शक्ती टिकून राहते.
  • तुळशीचा चहा प्यायल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. यामुळे रक्तदाबाची समस्या होत नाही.
  • तुळशीच्या चहाच्या सेवनाने कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते, यामुळे हृदरोग टाळता येतात.

महत्वाच्या बातम्या –