अतिवृष्टीमुळे मक्याची प्रतवारी घसरली

अतिवृष्टीमुळे मक्याची प्रतवारी घसरली corn

या वर्षी उत्तर महाराष्ट्र विभागात खरिपाची चार लाख 74 हजार 523 हेक्टर, तर रब्बीमध्ये 68 हजार 360 हेक्टरवर विक्रमी मका लागवड करण्यात आली. राज्यात आठ लाख 60 हजार हेक्टरवर खरीप, तर दोन लाख दहा हजार हेक्टरवर रब्बीचे उत्पन्न घेण्यात आले. प्रचंड उत्पन्न येत असतानाच अतिवृष्टीमुळे मक्याची प्रतवारी घसरली आहे.राज्यातील पोल्ट्री फीड उद्योगाला 15 ते 18 लाख टन, तर स्टार्च उद्योगाला सहा ते आठ लाख टन मका लागत असल्याचा अनुमान आहे.

आभाळ असल्याने फळभाज्यांची अवाक वाढली

नाशिक जिल्ह्यातील मका हे प्रमुख पीक आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात विक्रमी लागवड झाली मात्र पीक काढणीच्या अवस्थेत असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा मका शेतातच सडला आहे. शेतकऱ्यांचे जवळपास 30 टक्के पीक वाया गेले आहे. शिल्लक असलेल्या मक्यापैकी काही प्रमाणात मालावर काळे डाग पडले. त्यामुळे बाधित मका पोल्ट्री फिड उद्योगासाठी वापरात घेत नाहीत. परिणामी मक्याचे भाव प्रथमच सतराशे रुपयापेक्षा अधिक गेले. खरिपातील 30 टक्के पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांनी रब्बीवर लक्ष केंद्रित केले.

अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी ठोस तरतूद दिली गेली नाही – राजू शेट्टी

अतिपावसामुळे पीक वाया गेल्याने तसेच पिकावर काळे डाग पडल्याने उर्वरित चांगला मका पोल्ट्री फीड उद्योगासाठी एप्रिलच्या मक्यापर्यंत पुरू शकेल. त्यातही रब्बीची अपेक्षित लागवड झाली नाही. परिणामी किमान दोन महिने परराज्यातील मक्याची गरज भासणार आहे. एप्रिल-मे या दोन महिन्यांत बिहारमधून मोठ्या प्रमाणावर मका महाराष्ट्रात विक्रीसाठी येतो असतो.