‘या’ परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने या परिसराला आलंय कश्मीरचे स्वरुप

गारपीट

जालना – भाेकरदन तालुक्यातील मुठाड, इब्रहीमपूर, तांदुळवाडी मालखेडा, आव्हाना, फत्तेपूर, नांजा, मलकापूर, मनापूर मासनपूर, प्रल्हादपूर, सिपाेरा बाजार, विरेगावसह परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने या परिसराला कश्मीरचे स्वरुप आलंय.

गारांचा मारा इतका जोरदार होता की, परिसराला कश्मीर सारखे स्वरुप प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील अनेक भागात गारांचा खच जमा झालेला दिसून आला. यात अनेकांच्या गाड्या आणि घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी अडीच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह या जाेरदार पावसाने रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा या पिकांचे खुप माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आंब्याचा माेहर देखील गळून पडल्याने आंबा उत्पादकांचे देखील नुकसान झाले आहे.

दाेन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह थंडी देखील वाढली हाेती. शेतकरी अगाेदरच मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी, काेराेना आणि आता अवकाळी पावसासह गारपीटीमुळे हवालदील झाला आहे. जोरदार वादळ-वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे इथल्या शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालय.अचानक आलेला अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे माणसांसह पशू-पक्षांचीही तारांबळ उडाली.

महत्वाच्या बातम्या –