मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर – जिल्हाधिकारी

शाळांना उद्या सुट्टी

संपूर्ण राज्यात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पुण्यातही सध्या जोरदार पाऊस पडत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना ५ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

दरम्यान, जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि जुन्नर या तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा त्रास होऊ नये, म्हणून सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

शेतकऱ्यांना आता थेट गोदामांतून करता येणार आपल्या मालाची देशभर कोठेही विक्री

कांदा उत्पादकांसाठी धावले सुजय विखे ; लोकसभेत केली ‘ही’ मागणी
Loading…