लॉकडाऊन, संचारबंदीमुळे हापूस आंब्यांची आवक घटली

लॉकडाऊन, संचारबंदीमुळे हापूस आंब्यांची आवक घटली mango

परभणी – उन्हाळा येणार आहे, असे म्हटले की आठवण होते ती हापुस आंब्यांची. पण सलग दुसऱ्या वर्षी कोरोना, लॉकडाऊन तसेच संचारबंदीमुळे परभणी शहरामध्ये विक्रीसाठी येणारा आंब्याच्या आवकमध्ये घट झाली आहे. या कारणामुळे मात्र उशीराने हापूस आंब्याची आवक येण्याची सुरुवात झाली आहे.

परभणी शहरासह जिल्ह्याभरामध्ये देवगड तसेच रत्नागिरी (कोकण) येथिल हापूस आंब्यांची विक्रीसाठी खुप मोठ्या प्रमाणात दरवर्षी आवक होत असते. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हापूस आंब्याची कोकणामधून आवक होत असते. मागच्या वर्षी परभणीसह महाराष्ट्रभरामध्ये कोरोनाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत होते, दरम्यान यंदा देखील कोरोना रुग्णांची संख्या खुप झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. हा कोराना रग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. यातच लॉकडाऊन तसेच संचाबंदीमुळे  दळणवळणावर निर्बंध आल्याने कोकणामधून हापूस आंब्यांचा माल पोहचवण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.

त्यामुळे हापूस आंब्याची आवक कमी झाली असल्याने मात्र त्याच्या किंमतीवर परिणाम होणार असल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे. संचारबंदी तसेच लॉकडाऊन उठल्यानंतर हापूल आंब्यांची आवक वाढणार असल्याचे कृषी तसेच बाजार अभ्यासकांनी सांगितले. यातच स्थानिक हापूसला देखील मागणी वाढली आहे. कारण कोकणामधून येणारा हापूस कमी असल्यामुळे ग्राहक लोकलच्या हापूस आंब्याकडे वळाल्याचे पहावयास मिळत आहे.

सध्या हापूस आंब्याची आवक कमी असल्याने मागणी देखील कमी होत आहे. मात्र अक्षय तृतीयेनंतर आंबे खाणाऱ्यांची संख्या वाढत असते त्यामुळे अक्षय तृतीयेनंतर मागणी वाढणार असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे हापूस आंब्याचे विक्रेते सतिष सातोनकर यांनी सांगितले. हापूस आंब्याचे यंदाचे भाव : एक डझन – ६०० ते ७०० तसेच पेटीचे भाव ३८०० रुपये ( ६ डझन) तर मागच्या वर्षीचा भाव : ५०० ते ६०० रुपये एक डझन तर ३ हजार रुपयांची एक पेटी असा होता.

महत्वाच्या बातम्या –