युरिया खताच्या टंचाईमुळे ‘या’ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची होतेय धावाधाव

कोल्हापूर – युरिया खत हे एक प्रकारचे रासायनिक खत आहे., याला शेहचाळीस-शून्य-शून्य (४६-०-०) असेही म्हणतात. हे खत सरळ स्वरुपातील अमोनियम आणि नत्रवायू पुरवते (एनएच+). सकारात्मक चार्ज असलेल्या अमोनियम आयन (एनएच+) हा नॉनव्होलाटाइल (अस्थिर) आहे. सामान्यपणे वापरल्या जाणार्या सुक्या खतांमध्ये यूरिया खत नायट्रोजनचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

जोन्स एट अल यांच्या मते (२०१२), उच्च पोषण विश्लेषण, सुलभ हाताळणी आणि नायट्रोजनच्या प्रति युनिटचे वाजवी मूल्य यांसारख्या फायद्यांमुळे युनायटेड स्टेट्समध्ये युरियाला सर्वाधिक पसंतीचे कोरड्या नायट्रोजनयुक्त उर्वरक म्हणून युरिया चा वापर केला जातो.

यामुळे युरिया खत हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे असते. पण पावसाळा सुरु झाला की शेतकऱ्यांना दरवर्षी या खतांची प्रतीक्षा करावी लागते. आता सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यात युरिया खताची टंचाई आहे, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. वेळेत युरिया खत मिळाले नाही तर उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे देखील शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या तालुक्यात खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाली आहे. या शाहूवाडी तालुक्यात भात पिकाची लागवड जास्त केली जाते. त्यामुळे आता मात्र शेतकऱ्यांची प्रत्येक कृषी सेवा केंद्रासमोर युरिया मिळेल का आणि तो कधी मिळेल यासाठी धावपळ होत आहे.

तसेच मागील वर्षी देखील खरिपाच्या सुरुवातीलाच युरियाची टंचाई जाणवत होती. आता यावर्षी देखील तीच परिस्थिती असल्याचे दिसत आहे. सध्या युरियाची मागणी सातत्याने होत असल्याने कृषी सेवा केंद्र चालक देखील द्विधा मनःस्थितीत आहेत. मागील वर्षी देखील हीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी मिळेल तेथून जास्त किमतीने युरिया आणून त्याचा वापर पिकांमध्ये केला होता. तसेच बफर स्टॉक करण्यासाठी युरियाची साठवणूक शासनाकडून होत असल्याने युरियाची टंचाई जाणवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –