हरभऱ्याच्या क्षेत्रात सरासरीच्या दीडपट वाढ झाल्याने, भरघोस उत्पादन

हरभऱ्याच्या क्षेत्रात सरासरीच्या दीडपट वाढ झाल्याने, भरघोस उत्पादन होईल. गव्हाची देखील सरासरी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार ६५ हेक्टर असून, ५६ लाख १३ हजार २३५ हेक्टरवरील पेरणीची कामे झाली आहेत. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवली होती. परिणामी राज्यात निम्म्या क्षेत्रावर देखील पेरणी होऊ शकली नाही. यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बीने सरासरी गाठली आहे.

दुष्काळात तेरावा ; खताच्या किमतीत वाढ

हरभऱ्याच्या क्षेत्रात यंदा चांगली वाढ झाली असून हरभऱ्याचे  सरासरी क्षेत्र १४ लाख ९० हजार २४७ हेक्टर असून, त्यात २२ लाख ५१ हजार ७ हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे. जवस, तीळ, करडई, सूर्यफूळ या तेलबियांचे सरासरी क्षेत्र १ लाख ६१ हजार ७९३ हेक्टर असून, त्या पैकी ३९ हजार ४४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात येत आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून,१८ लाख ४८ हजार ७७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.