दुष्काळाच्या तीव्रतेमुळे राज्यभरातील तुतीचे ६ हजार ५०० एकर क्षेत्र घटले

दुष्काळाच्या तीव्रतेमुळे राज्यभरातील तुतीचे ६ हजार ५०० एकर क्षेत्र घटले tuti

दुष्काळाच्या तीव्रतेमुळे राज्यभरातील ६ हजार ५०० एकर क्षेत्र घटले आहे, त्यात औरंगाबाद विभागातील चार हजार हेक्टरला फटका बसला होता. राज्यात मागील काही वर्षांत तुतीच्या लागवडीवर शासनाने भर दिला आहे. रेशीमकोषाला स्थानिक बाजारापेठा निर्माण होण्यासाठीही राज्य शासनाने प्रयत्न केल्याने तुतीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली होती.

शेतकरी कर्जमाफीसाठी 30 हजार कोटींची गरज

तुती लागवडीचा मनरेगामध्ये समावेश केल्याने लागवडीपासून सलग तीन वर्षे दोन लाख ९५ हजार रुपये अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मिळतात. शिवाय कमी पाण्यावर येणारे हे पीक आहे. तुतीचे क्षेत्र २३ हजार ५०० एकर इतके झाले होते. मात्र मागील वर्षी दुष्काळाची प्रचंड दाहकता असल्याने तुतीच्या क्षेत्रावर मोठी घट झाली आहे. राज्यातील जवळपास ६ हजार ५०० एकर क्षेत्र जळाले होते. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील चार हजार एकर, पुणे विभागातील एक हजार एकर, अमरावती विभागातील ११०० एकर तर नागपूर व अन्य एक अशा दोन जिल्ह्यांतील ४०० एकर क्षेत्र कमी झाले आहे.

बाजार समित्यांमध्ये मुगाच्या दरात वाढ

यावर्षी मात्र त्याच रेशीमकोषचा दर ४०० ते ५०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. चांगला पैसा मिळू लागल्याने शिवाय बाजारपेठही जवळच उपलब्ध झाल्याने शेतकºयांच्या हातात चार पैसे राहू लागले आहेत.