राज्यात दिवसभरात तब्ब्ल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात

कोरोना

मुंबई – राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे.

महाराष्ट्रात आज ४२,३२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५१,८२,५९२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ % एवढे झाले आहे.आज राज्यात २२,१२२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ३६१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३२,७७,२९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,०२,०१९ (१६.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,२९,३०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,९३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या –