जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी लाभदायक, हे खाल्याने अनेक समस्या होतात दूर

जिरे आणि गुळ

स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांमध्ये अनेक असे पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यांच्या नियमित आणि प्रमाणात सेवन करण्यामुळे अनेक फायदे होत असतात. मात्र याची आपल्याला माहिती नसते. घरात जीरे आणि गुळ यांचा नेहमीच वापर होतो. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला खूप फायदा होतो. आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या या दोन पदार्थांच्या एकत्र सेवनामुळे काय फायदा होतो हे जाणून घेऊया……

पाच वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले, ते पाहावे – अमोल कोल्हे  • शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यास अ‍ॅनिमिया धोका निर्माण होऊ शकतो. ही समस्या मुख्यतः गर्भवती महिलांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळते. अ‍ॅनिमिया आजाराला दूर ठेवण्यासाठी गूळ आणि जिऱ्याचे सेवन करावे. गुळामध्ये जास्त प्रमाणात लोहाचे घटक असतात. शरीराला पुरेशा प्रमाणात लोहाचा पुरवठा झाल्यास अ‍ॅनिमियाचा धोका कमी होतो. तर जिऱ्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत सुरू राहते.
  • उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे हृदय रोगाशी संबंधित कित्येक आजारांची लागण होण्याची आणि स्ट्रोक येण्याचाही धोका असतो. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये गूळ आणि जिऱ्याचा समावेश करा. गूळ आणि जिऱ्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे घटक जास्त प्रमाणात आहेत. हे घटक उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्याचं कार्य करतात. यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी गूळ आणि जिऱ्याचे सेवन करावे. पण आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी तंत्रज्ञान पोहोचवा – कृषीमंत्री

  • हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. जिरे आणि गुळाचे सेवन केल्यानं हाडांची मजबुती वाढण्यास मदत होऊ शकते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार या दोन्ही पदार्थांमध्ये हाडांसाठी उपयुक्त असलेले गुणधर्म आढळले आहेत. एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. यासाठी वयोवृद्ध किंवा लहान मुलांसाठी जिरे आणि गुळाचे सेवन आरोग्यदायी असतं.
  • रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यासाठी गूळ आणि जिरे अतिशय लाभदायक आहे. या दोन्ही खाद्यपदार्थांमध्ये अँटी ऑक्सिडेंटचे भरपूर प्रमाण आहेत. हे घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे कार्य करतात. रोगप्रतिकारक शक्ती बळकट असल्यास आपले कित्येक गंभीर आजारांपासून संरक्षण होते.

चक्क कृषिमंत्र्यांनी धरले शेतकरी जोडप्याचे पाय; शेतकरी कुटुंबही भारावले

  • जिरे आणि गूळ सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. गूळ आणि जिऱ्याचा औषधी स्वरुपातही उपयोग केला जातो. जिऱ्यामुळे सर्दी खोकला कमी होतो तर गुळामुळे फुफ्फुस आणि घशाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते. खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी गूळ आणि आल्याचे एकत्रित सेवन करावे.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे

जाणून घ्या काय आहेत डाळिंब खाण्याचे फायदे…