‘ही’ भाजी खाणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते, जाणून घ्या फायदे

चाकवत

चाकवत भाजी चवीला रुचकर असून यात असणाऱ्या अनेक पोषकतत्वे व व्हिटॅमिन्समुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. चाकवत भाजीमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B आणि व्हिटॅमिन-C चे प्रमाण भरपूर असते. चाकवतमध्ये Riboflavin आणि फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन B मुबलक प्रमाणात असते तर आयर्न (लोह), कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर्स (तंतुमय पदार्थ) यासारखी अनेक पोषकतत्वे असतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे….

गुळाचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

  • पोट फुगणे यासारख्या पोटांच्या विकारात ही भाजी उपयुक्त ठरते. अनेक दिवस चाकवत भाजी खाल्याने पोटातील कृमींही कमी होतात.
  • या भाजीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यानी ही भाजी आहारात घ्यावी. रक्तल्पता किंवा ऍनिमिया आजारात ह्या भाजीचे सेवन करावे. रक्तातील अशुद्धी दूर करण्यासही मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येणे, अनेक त्वचा विकार यांवर ही भाजी उपयुक्त आहे.

बळीराजा हतबल; राज्यातील शेतकऱ्यांवर नव्या व्हायरसचं संकट

  • छातीत जळजळ होत असल्यास मसाले न घालता साध्या पद्धतीने पातळ भाजी तयार करून त्याचे सेवन करावे. अशा साध्या पद्धतीने केलेली भाजी ही कावीळ झालेली असल्यास आहारात घ्यावी.
  • ही भाजी रुचकर आल्याने ताप किंवा आजारपणामुळे  तोंडाची चव गेली असल्यास भाजीच्या सेवनाने तोंडाला चव येते.
  • लघवीस जळजळत असल्यास असल्यास दररोज 10 ग्रॅम चाकवतच्या पानांच्या रसात 50 मिली पाणी मिसळून प्यावे.

महत्वाच्या बातम्या –

मोड आलेले मूग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘हे’ आहेत योग्य आहार, जाणून घ्या