यंदाचा आर्थिकबजेट कि इलेक्शन बजेट ?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘लोकसभा लक्ष २०१९’ ध्येय  ठेऊन अर्थसंकल्प सादर केल्याची चर्चा आहे. यावर्षी सादर केलेला अर्थसंकल्प कृषी आणि ग्रामीण भागाबरोबरच एकूणच अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे एकाबाजूने हा अर्थ संकल्प लोकसभा निवडणुकीचा प्रचार समजला जात आहे.

Maharashtra Farmers To Begin 'Strike' From 20 October
File Photo

शेतकरी वर्ग केंद्रसरकारवर नाराज आहे. कर्जमाफी साठी शेतकरी रस्त्यावर देखील उतरले होते. तसेच महाराष्ट्रात इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संप पुकारण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची दखल घेण्यात आल्याचे चित्र आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा देण्याची घोषणा केली आहे. पुढील खरीप हंगामापासून याची अंमलबजावणी केली जाईल. तसेच, शंभर कोटींची उलाढाल असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी पुढील पाच वर्षे करमुक्त असणार आहेत. सामान्य जनतेसाठी सर्वसाधारणत: ‘प्राप्तिकरामध्ये किती सूट मिळाली’ आणि ‘काय स्वस्त झाले, काय महागले’ या दोन मुद्यांभोवती अर्थसंकल्प फिरतो. पण यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भाग, शेतकरी आणि शेतीशी संबंधित असलेल्या व्यवसायांना चांगला वाटा मिळाल्याचे दिसत आहे.