भिवापुरी मिरचीची उत्पादन क्षमता व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक – कृषिमंत्री

कृषिमंत्री

नागपूर – कोरोनाच्या काळात कोणतीही अडचण भासू नये, म्हणून शेतकऱ्याने स्वतःच्या जीवावर उदार होत पोटाला चटके देत घाम गाळला. महामारीच्या धास्तीने सर्वकाही बंद असताना शेती मात्र सुरूच होती.कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शनिवारी भिवापूरचा दौरा केला. दौ-यात ते शेतक-यांच्या बांधावर पोहचले. पिक पाहणी केली. आणि मग नंतर आमदार राजू पारवे यांच्यासोबत येथील हजारो महिलांना रोजगार देणा-या मिरची कटाई केंद्रावर पोहचले. जमिनीवर बसून त्यांनी मजुरांच्या अडचणी जाणून घेतल्या. मिरची कटाई केंद्रावर चालणारे कामकाज समजून घेतले. यानिमित्ताने त्यांनी भिवापुरी मिरची उत्पादनातील तिखट समस्या अनुभवल्या.

पाच वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले, ते पाहावे – अमोल कोल्हे

यावेळी कृषिमंत्री म्हणाले की,आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे नावलौकिक प्राप्त असलेल्या भिवापुरी मिरचीचा दर्जा आणि उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यांनी यावेळी कृषी विद्यापीठाने या अनुषंगाने संशोधनात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसेच भिवापुरी मिरची जगभर प्रसिद्ध आहे. परंतु, “खर्च अधिक व उत्पादन क्षमता कमी ‘ यामुळे शेतकऱ्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे. या मिरचीची उत्पादन क्षमता व गुणवत्ता वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून भिवापुरी मिरचीवर संशोधनाची गरज असल्याचे पारवे यांनी कृषिमंत्री भुसे यांना पटवून देत सोबतच मिरचीवर प्रक्रिया करणारे एखाद मोठे उद्योग स्थापन करण्याची आवश्‍यकता विषद केली.

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी तंत्रज्ञान पोहोचवा – कृषीमंत्री

त्यावेळी उदासा येथील प्रवीण वंजारी या युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा दिला आहे. त्यांनी योजनांमधून शेडनेट उभारले असून, त्या माध्यमातून भाजीपालावर्गीय पिके, फळांची रोपे तयार करून ते शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे वंजारी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

चक्क कृषिमंत्र्यांनी धरले शेतकरी जोडप्याचे पाय; शेतकरी कुटुंबही भारावले