किसान रेल ‘या’ जिल्ह्यातून सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू

अमरावती – पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठीअतिशय उपयुक्त ठरणारी किसान रेल अमरावतीवरून सुरू करण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहे आणि ती लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

पश्चिम विदर्भ विकास परिषदेच्यावतीने शुक्रवारी सांयकाळी ‘जनतेशी संवाद’ कार्यक्रम आभासी स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी किसान रेल सुरू करण्याची केलेली मागणी अतिशय योग्य असून नागपुरात शनिवारी रेल्वेच्या अधिकार्यांसोबत बैठक आहे. चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल.

शेतकरी, व्यापारी संघटना व उपलब्ध बाजारपेठ यांची सांगड घालून किसान रेलचा उद्देश यशस्वी करण्यात येईल. पश्चिम विदर्भाच्या विकासात शेतीयोग्य पाण्याची उपलब्धता महत्वाची आहे. त्यासाठी सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता आहे. युवकांनी पारंपरिक शेती बरोबरच बदलत्या काळात पिक पद्धतीतही बदल करावा. विदर्भातल्या संत्र्याला विविध कंपन्यांकडे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचविणे शक्य आहे. त्यातून संत्र्याला उत्तम भाव मिळले. सीताफळाला देशभरात प्रचंड मागणी असून ते वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावा.

अमरावतीत उद्योजगता विकास केंद्रला मान्यता मिळाली आहे. त्याला एमएसएमईची मान्यता असून एमआयडीसीत जागा मिळाली आहे. विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, संशोधकासाठी नवीन दालन उपलब्ध झाले आहे. घराच्या विजेवर चालणारे जिनिंग विदर्भातल्या प्रत्येक घरात सुरू होऊ शकतात व युवकांनी मोठ्या प्रमाणत असे प्रकल्प सुरू करावे. त्यासाठीच्या प्रशिक्षणाची सोय करता येईल.

विदर्भातील प्रत्येक गावचे मॅपिंग करा. छोट्या गावांचे समूह तयार करून त्याचे क्लस्टर तयार करा. प्रत्येक क्लस्टरला एक विशष्ट उत्पादन जोडून त्याची व्याप्ती वाढवणे ही काळाची गरज आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. या कामात महिला बचत गटांनी पुढाकर घेतल्यास महिलांचे, कुटुंबाचे व देशाचे आर्थिक चित्र बदलेल. संपूर्ण विदर्भात 22 इंक्युबेशन सेंटर सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये पश्चिम विदर्भ विकास परिषदेची रूपरेषा परिषदेचे अध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी मांडली

महत्वाच्या बातम्या –