‘या’ तालुक्यात काजू उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

काजू

चंदगड : चंदगड तालुका कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेशी जोडलेला तालुका आहे. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात काजुचे उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांना काजू उत्पादनासाठी अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी तालुक्यात काजू उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार संजय मंडलिक मंडलिक म्हणाले आहेत.

सुके खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

चंदगड तहसील कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक राज्यमंत्री राजेंद्र-पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, नगरपंचायतीच्या अध्यक्षा प्राची काणेकर, पंचायत समिती सभापती आनंद कांबळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पी पाटील आदी उपस्थित होते.

तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

खासदा रसंजय मंडलिक म्हणाले, राज्यात आरोग्याची सक्षम यंत्रणा उभी करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. चंदगड तालुक्याने कोरोनाचा समर्थपणे मुकाबला केल्याने आज तालुक्यात रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र पुढील काळातही ग्रामस्थानी व यंत्रणनेने दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतर पाळावे. ग्रामीण भागात आयसीयुसह आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार फंडातून १ कोटीचा निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले. चंदगड तालुक्यात ट्रामा केअर सेंटर उभारावे. तालुक्यास शव वाहिका मिळावी तसेच तालुक्यातील आरोग्य विभागाकडील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी त्यांनी केली.

कांदा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

प्रारंभी प्रांताधिकारी श्रीमती पांगारकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात चंदगड तालुक्यातील कोरोना रुग्ण, प्रशासनामार्फत केलेल्या उपाय योजना याबाबात माहिती दिली. तहसीलदार श्री. रणवरे यांनी आभार मानले. तत्पुर्वी आमदार राजेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून चंदगड ग्रामीण रुग्णालयासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ जिल्ह्यात पुन्हा रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पूरग्रस्तांना तातडीने मदत करा – नाना पटोले