Electric Bike | फक्त इलेक्ट्रिक कारच नाही तर ‘या’ इलेक्ट्रिक बाईक देखील आहेत शानदार

Electric Bike | फक्त इलेक्ट्रिक कारच नाही तर 'या' इलेक्ट्रिक बाईक देखील आहेत शानदार

जर तुम्ही आता पेट्रोल बाईक सोडून इलेक्ट्रिक बाईकचा विचार करत असाल तर ही कल्पना काही वाईट नाही. फक्त तुमचे बजेट एक लाख रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत पाहीजे. कारण या किमतीत तुम्हाला रिव्हॉल्ट RV400 ही सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक बाईक तसेच आणखी बरेच पर्याय मिळतील. या इलेक्ट्रिक बाईकचे केवळ लूक आणि फीचर्सच चांगले नाहीत. उलट त्यांची बॅटरी रेंजही उत्तम आहे. एका चार्जवर, या इलेक्ट्रिक बाईक 100-200 किमी पर्यंत प्रवास करण्यास सक्षम आहेत. अशाच आणखी काही इलेक्ट्रिक बाईकची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक

रिव्हॉल्ट RV400 ही इलेक्ट्रिक बाईक मध्ये भारतात सर्वाधिक विक्री बाईक आहे. या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला Revolt RV400 ची किंमत 1.25 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये मिळेल. या बाईकचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे. आणि याची बॅटरी रेंज एका चार्जमध्ये 150 किमी पर्यंत आहे. त्याच वेळी, अलीकडे लॉंच झालेल्या टॉर्क क्रॅटोसची (Tork Kratos) किंमत 1.22 लाख ते 1.37 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. याचा टॉप स्पीड 105 किमी प्रतितास आहे. ही बाईक एका चार्जवर 180 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. याशिवाय ओबेन रॉर (Oben Rorr) बाईक देखील यावर्षी लॉंच करण्यात आलेली आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.03 लाख रुपये आहे. या बाईकचा कमाल वेग 100 किमी प्रतितास आहे आणि याची बॅटरी रेंज 200 किमी पर्यंत आहे.

अलीकडील लॉंच झालेली Hope Oxo पण आहे शानदार 

आणखी एक इलेक्ट्रिक बाईक, Hope Oxo, या महिन्यात लाँच करण्यात आली. या बाईकचा टॉप स्पीड ताशी 95 किमी आहे. एका चार्जवर ही बाईक 150 किमी पर्यंत धावू शकते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख ते 1.40 लाख रुपये आहे. दुसरीकडे, इलेक्ट्रिक क्रूझर बाईक म्हणजे कोमाकी रेंजर (Komaki Ranger). ज्याचा टॉप-स्पीड 95 किमी प्रतितास आहे आणि बॅटरी रेंज 200 किमी आहे. याची किंमत 1.68 लाख रुपये आहे, ही बाईक Kavsky Avenger सारखी डिझाइन केलेली आहे. त्यामुळे याची बसण्याची स्थिती खूपच आरामदायक आहे.

ओडिसी आणि कबीरा EV बाईक

यानंतर ओडिसी इलेक्ट्रिक इव्होकिस येते. ज्याची बॅटरी रेंज 140 किमी आहे आणि टॉप स्पीड 80 किमी प्रति तास आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला ही बाईक 1.71 लाख रुपयांना मिळेल. कबीरा मोबिलिटी KM (Kabira Mobility KM) अशी आणखी एक बाईक आहे जी एका चार्जवर 150 किमी चालते. आणि टॉप-स्पीड 120 किमी प्रतितास पर्यंत आहे. या बाईकची किंमत 1.37 लाख रुपये आहे. One Electric Motorcycles Kridn हा देखील एक चांगला पर्याय आहे. ज्याची किंमत 1.35 लाख रुपये आहे. ही बाईक एका चार्जवर 110 किमी पर्यंत धावू शकते. आणि त्याचा टॉप स्पीड ताशी 95 किमी आहे.

महत्वाच्या बातम्या