Electric Scooter | ‘या’ आहेत टॉप इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Electric Scooter | 'या' आहेत टॉप इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टीम महाराष्ट्र देशा: सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) चा ट्रेंड सुरू आहे. देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपन्या सतत आपले नवीन मॉडेल्स लाँच करत असतात. यामध्ये उत्कृष्ट फीचर्ससह अनेक मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर बातमी तुमच्यासाठी आहेत. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वोत्तम स्कूटर पर्यायांबद्दल माहिती सांगा.

ओला S1 (Ola S1)

ओला S1 (Ola S1) इलेक्ट्रिक स्कूटर ही देशातील सर्वोत्तम रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. Ola च्या या स्कूटरचे बाजारात दोन प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये S1 आणि S1 Pro यांचा समावेश आहे. Ola S1 ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जर 180km पर्यंत रेंज देऊ शकते. ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 8.5kW ची पॉवर मोटर आहे. जी 58Nm टार्क निर्माण करते. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरुम किंमत 79,999 ते 1.40 लाख रुपयांपर्यंत आहे.

बजाज चेतक (Bajaj Chetak)

बजाज चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4.08kW ब्रेशलेस डिसी मोटर उपलब्ध आहे. ही मोटार 16Nm टार्क निर्माण करते. ही स्कूटर इको मोडमध्ये 95km आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 85km रेंज देऊ शकते. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी पाच तास लागतात. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.47 लाख रुपये आहे.

हिरो विडा V1 (Hiro Vida V1)

हिरोची हिरो विडा V1 ही स्कूटर बाजारामध्ये दोन पर्यायांत उपलब्ध आहे. यामध्ये V1 Pro आणि V1 Plus यांचा समावेश आहे. या स्कूटर अनुक्रमे 165 किमी आणि 143 किमी पर्यंत रेंज देतात. या स्कूटर फक्त 65 मिनिटांमध्ये 0-80 टक्क्यापर्यंत चार्ज केले जाऊ शकतात. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.28 लाख आणि 1.39 लाख रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या