Electric Scooter | High रेंज सह बाजारात उपलब्ध आहे ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर

Electric Scooter | High रेंज सह बाजारात उपलब्ध आहे 'या' इलेक्ट्रिक स्कूटर

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक स्कूटर Electric Scooter चा ट्रेंड वाढत चालला आहे. या वाढत्या ट्रेंडमुळे इलेक्ट्रिक स्कूटरची एक मोठी लाईन तयार झालेली आहे. अशा परिस्थितीत टू व्हीलर वाहक निर्माता कंपनी देखील आपल्या नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच करत आहेत. प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी उत्तम वैशिष्ट्यांसह आपले इलेक्ट्रिक स्कूटर वर्जन सादर करत आहे. जर तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वोत्तम रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल माहिती सांगणार आहोत.

Ola S1

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी Ola ची Ola S1 ही सर्वोत्तम फीचर्स आणि हाय रेंज देणारी स्कूटर आहे. Ola S1 मध्ये 4kwH क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आलेले असून ती 8500W IPM इलेक्ट्रिक मोटरशी जोडली गेलेली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या टॉप मॉडेलला 181 किलोमीटर पर्यंतची रेंज मिळते तर या मॉडेलच्या सर्वात खालच्या प्रकारांमध्ये 101 किलोमीटरची रेंज मिळते. S1 हे मॉडेल 3 प्रकारात उपलब्ध असून या मॉडेल्सची एक्स शोरूम किंमत 79,999 ते 1.40 लाख रुपये एवढी आहे.

Ather 450X

Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर बाजारामध्ये दोन प्रकारात उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3.7kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे, जो 6200W मोटर सोबत जोडलेला आहे. जवळजवळ साडेचार तासांमध्ये ही स्कूटर पूर्ण चार्ज होते. या स्कूटरच्या रेंज बद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर 140 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते त्याचबरोबर ही ताशी 80 किलोमीटर वेगाने धावते. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम ची किंमत 1.17 लाख ते 1.39 लाख रुपये एवढी आहे.

Simple One

Simple One इलेक्ट्रिक स्कूटर बाजारामध्ये सिंगल पॅक आणि डबल पॅक बॅटरी उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 236 किलोमीटरच्या सर्वोत्तम रेंजमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये 8500W मोटर उपलब्ध असून ती 4.8kWh क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरी सहज जोडली गेलेली आहे. ही स्कूटर प्रति तास 105 किमी वेगाने धावू शकते. या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख असून याच्या टॉप मॉडेलची किंमत 1.45 लाख रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या