Electric Scooter Launch | Komaki ची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर झाली लाँच

Electric Scooter Launch | Komaki ची 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर झाली लाँच

टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) चा ट्रेंड वाढत चालला आहे. अशात देशातील लोकप्रिय इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी कोमाकी (Komaki) ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर देशात लाँच केली आहे. कोमाकीने आपली कोमाकी फ्लोरा (Komaki Flora) ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारामध्ये सादर केली आहे. कोमाकी फ्लोरा ही इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमधील कमीत कमी बजेटमध्ये येणारी स्कूटर आहे. या स्कूटरमधील बॅटरी काढण्याजोगी आहे. त्याचबरोबर ही स्कूटर एका चार्जवर 100 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकते. चार रंगांच्या पर्यायासह ही स्कूटर बाजारात लाँच करण्यात आली आहे.

फीचर्स

कोमाकी फ्लोरा ही स्कूटर बाजारामध्ये पार्किंग आणि क्रूज कंट्रोल,रिझर्व गिअर, सेल्फ डायग्नोस्टिक मीटर, व्हायब्रंट डॅशबोर्ड या वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्कूटरच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आलेला आहे. ब्लॅक, रेड, ग्रे आणि ग्रीन या चार पर्यायांसह ही स्कूटर बाजारामध्ये उपलब्ध आहे.

लुक

कोमाकी फ्लोरा ही स्कूटर अतिशय आकर्षक डिझाईनमध्ये बनवण्यात आलेली आहे. यामध्ये गोल आकाराचे हेडलाईट लॅम्प देण्यात आलेले आहे. या स्कूटरचे सीट अतिशय आरामदायी असून मागील सीटर बॅक रेस्ट देखील देण्यात आलेला आहे.

रेंज आणि किंमत

कोमाकीने दिलेल्या माहितीनुसार, कोमाकी फ्लोरा ही स्कूटर एका चार्जमध्ये 80 ते 100 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. या स्कूटरला 100 किलोमीटर धावण्यासाठी सुमारे 2 युनिट वीज खर्च करावी लागू शकते. या स्कूटरची एक्स शोरुम किंमत 79,000 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या