‘या’ दोन जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर – राजेश टोपे

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दोन दिवसात कोरोना चाचणी होणार सुरु

सातारा –  सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले पाहिजे. तसेच प्रत्येक कोरोना रुग्णामागे कमीत कमी 15 निकट सहवासितांची टेस्ट केली पाहिजे. यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात येईल. तसेच या जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या.

पुन्हा ‘या’ जिल्ह्यातील ५ शहरांमध्ये १० दिवसांसाठी लॉकडाऊन

कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली तर खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती सातारा-कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भात आढावा बैठक आज संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास  मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, हातकणंगलेचे  आमदार राजू आवळे, कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव, कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके , सातारा जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

पालक खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

कोरोना टेस्टिंग अहवालाला 2 ते 3 दिवस लागत आहेत, त्यामुळे बाधितांवर उपचार करण्यास उशीर होत आहे, असे सांगून सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, संबंधिताचा नमुना घेतल्यानंतर त्याचा अहवाल हा 24 तासात प्राप्त झाला पाहिजे म्हणजे संबंधितांवर वेळेत उपचार करता येतील. राज्य शासन येत्या काही दिवसात 500 रुग्णवाहिका खरेदी करणार असून त्यांचे वाटप राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांना करण्यात येणार आहे. बऱ्याच रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नाहीत म्हणून उपचार करण्यास उशीर होत आहे तरी सातारा व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णवाहिका अधिगृहित कराव्यात.

शासकीय रुग्णालयांमध्ये फिजीशयनची कमतरता आहे तरी खासगी हॉस्पिटलच्या  फिजिशीयनची सेवा कोरोना रुग्णांसाठी घ्यावी , त्यांनी  मानवतेच्या दृष्टीकोनातून 6 ते 7 दिवस कोविड रुग्णालयांमध्ये काम करावे, असे सांगून सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंर्तत कोल्हापूर जिल्ह्यात 45 रुग्णालये व सातारा जिल्ह्यातील 27 रुग्णालये आहेत, या रुग्णालयांमध्ये कोरोना संसर्गावर सर्वांसाठी मोफत उपचार केले जात आहेत. कुठले रुग्णालय पैसे घेत असले तर त्या रुग्णालयावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी, अशा सूचना करुन येत्या एक- दोन दिवसात सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे  कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कोरोनाचे काही रुग्ण हे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत काही रुग्णालये शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने देयक रुग्णांकडून अदा करुन घेत आहेत, अशा काही तक्रारी येत आहेत सातारा  व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय विभागांमध्ये जे ऑडिटर असतात त्यांची नेमणूक करुन त्यांच्यामार्फत देयक तपासणी करुन ते संबंधित रुग्णाला देण्यात यावे. तसेच भरारी पथकाचीही नेमणूक करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील जागा रिक्त आहेत त्या जागा भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत तरी त्यांनी ज्या रिक्त जागा आहेत त्या तात्काळ भराव्यात.  इतर आजारांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात  जाणाऱ्या रुग्णांना उपचार करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत, अशा   तक्रारी येत आहेत,  अशा रुग्णालयांवर जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी.

महत्वाच्या बातम्या –

अक्रोड खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

ताक पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या