भाजपच्या कार्यक्रमाचा पर्यावरण प्रेमींना फटका

पुणे : शहरात बाल गंधर्व रंग मंदिरात काल पासून भारतातील पहिले पर्यावरण साहित्य संमेलन सुरु होते. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात येणार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने वेळेवर बालगंधर्व मंदिरात कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे बालगंधर्व प्रशासनाने संमेलन अर्ध्यातच थांबविण्यास सांगितले. याचा फटका पर्यावरण प्रेमीनां बसला आहे.

बालगंधर्व सभागृहात कालपासून पर्यावरण साहित्य संमेलन सुरु आहे. आज संमेलनाचा शेवटचा दिवस होता. परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या “भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी?”  या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व सभागृहात प्रकाशन होणार आहे. त्यामुळे सुरु असलेले पर्यावरण संमेलन बंद करावे लागले. संमेलनात आलेले पर्यावरण साहित्यिक नाराज होऊन परत गेले. बालगंधर्व प्रशासने वेळेवर संमेलन बंद करायचे सांगितल्यामुळे संमेलनाचे सह समन्वयक ललित राठी यांनी नाराजी व्यक्त केली.




Loading…