बॅंकेच्या खात्यात ‘झिरो बॅलन्स’ असले तरीही बॅंकेतून काढू शकता ५ हजार रूपये, जाणून घ्या

केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री जनधन योजना एक महत्वपूर्ण ठरली आहे. या योजनेंतर्गत देशातील अनेक गोरगरीब नागरिकांनी आणि इतरांनी बँकेत खाती उघडलेली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मिळणारे अनुदान, पेंशन हे आता केंद्र सरकार थेट नागरिकांच्या खात्यावर जमा करण्यात येते. तसेच या योजनेचा लाभ देशातील बहुतांश नागरिकांनी घेतला आहे.

शुन्य रूपयात उघडते खाते, या योजनेपूर्वी देशातील अनेक नागरिकांची बँकेत खाती उघडलेली नव्हती. कारण की या आधी सर्वसामान्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी पैसे लागायचे यामुळे अनेक जणांना खाते उघडणे शक्य झाले नाही. काही वर्षापूर्वी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना राबवली आणि या योजनेच्या माध्यामातून देशातील बहुतांश नागरिकांनी शुन्य रूपयात बँकेत खाती उघडली

या माध्यमातून महिला, मुले आणि कुटुंबप्रमुख आपले कष्ट करून मिळवलेले पैसे बचत म्हणून ठेवू शकतात. कोरोना साथीच्या काळात या योजनेंतर्गत बर्‍याच लोकांना फायदा झाला आहे.

जनधन या खात्यावर शिल्लक शुन्य असलेल्या रकमेवर ५ हजार रूपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील उपलब्ध आहे. जर तुम्हालाही या मिळणाऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्वाची कामे करणे गरजेचे आहे. तर चला ती पाहुयात.

आधार कार्ड करा बँकेशी लिंक योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. जर तसे नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही सांगण्यात आले आहे. ऐवढेच नाही तर या आधी तुम्ही तुमच्या जनधन खात्यातून ६ महिने आधी टान्जेक्शन केले असणे गरजेचे आहे. जर तुम्ही या दोन्ही गोष्टी केलेल्या असतील तर तुम्ही सहज पणे ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.

दरम्यान, ज्या खातेधारकाचा बँक खात्याचा इतिहास चांगला आहे. तसेच खात्यातील व्यवहारही चांगले होतात किंवा राहतात ते नागरिक सहजपणे ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या –