कोरोना संकटामध्ये देखील राज्याचा विकासाचा गाडा थांबणार नाही – अजित पवार

पशुधन

बीड – राज्य सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीत आलेल्या कोरोना संकटामध्ये देखील राज्याचा विकासाचा गाडा थांबला नाही आणि थांबणार नाही याची काळजी घेतली गेली. निधीची चणचण असूनही आरोग्य, रुग्णालय आणि विकास कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. विकास कामांसाठी येणारा पैसा हा जनतेचा असून यामधून होणारी कामे दर्जेदारच असली पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बारकाईने काळजीपूर्वक लक्ष द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

बीड येथे १०० कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते बीड येथे संपन्न झाले. उपमुख्यमंत्री श्री. पवार हे मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले.

दोन वर्षाच्या काळात कोरोना संकटाच्या काळात देखील राज्याने दिला जिल्ह्यात मोठा विकास निधी

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आग्रही मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजना, विकासाच्या अन्य योजना, आमदार निधी आदींमध्ये कोणतीही कपात केली नाही. बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार करता, डीपीडीसी मधून ३६० कोटी रुपयास नुकतीच मंजुरी दिली, ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ व त्यास २० कोटी भागभांडवल साठी तरतूद, वसतीग्रहासाठी निधीची तरतूद, नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा हिश्शाचा निम्मा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांत साठी विकास निधी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मोदक मोठ्या प्रमाणात तरतूद असा विविध योजनातून विकास निधी दिला गेला आहे.

केंद्र सरकार सारखे राज्यांना नोटा छापायला अधिकार नसल्याने राज्याच्या उत्पन्नातून हा निधी दिला जातो. बीड शहरासाठी अमृत योजनेतून दोन पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यास पाण्याचे प्रश्न सुटू शकेल परंतु नगरपरिषदेचे वीज बिल थकीत आहे. आर्थिक शिस्त देखील लागण्याची गरज आहे यावर उपाय काढण्यासाठी प्रशासक आणि बीडचे आमदार यांना सूचना केली आहे.

कोरोना बरोबरच नैसर्गिक आपत्ती साठी निधी दिला गेला आहे. जगात काही ठिकाणी कोरोना साथीची चौथी लाट देखील आली आहे . त्यामुळे आपण गाफील न राहता लसीकरण केले जावे बूस्टर डोस व विद्यार्थ्यांचे लसीकरणा मध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणा व उपस्थितांना केले.

महत्वाच्या बातम्या –