यांञिकीकरणाला फाटा देत खेड्यात अजुनही बैलजोडीला महत्त्व.

पैठण/प्रतिनीधी (किरण काळे) : आधुनिक यांञिक पध्दतीचा बहुतेक ठिकाणी शेतमशागत व बैलगाडी सारख्या वाहतुकीच्या साधना ऐवजी ट्रँक्टर व ट्रिलर इत्यादींचा उपयोग आज घडीला होत असतांना ही.पैठण तालुक्यातील ढाकेफळ परिसरासह जायकवाडी गोदाकाठच्या खेडोखेडी गावोगावी अजुनही पारंपारिक पध्दतीने शेती कसण्यासाठी व शेत साधनांच्या औजाराची,शेती मालाची वाहतुक करण्यासाठी होत असल्याचेआजही पहायला मिळते.

काही प्रमाणात फरक पडला असला तरी जायकवाडी धरणाच्या गोदाकाठी पाण्याच्या सुविधेमुळे बैल,गाई,जनावरांना चारण्यासाठी हिरवेगार गवत,वाढे,चरायला मुबलक मिळत असल्यामुळे बैलजोड्या व गाईंसह वासरे,जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात टिकून आहे.तसेच बैलगाडी,ओखर,पेरणीसाठी लागणारे टिफन आदी बैलजोडींवर चालणारे साहित्य आजही पिढ्याणपिढ्या टिकून असुन त्याचा वापर होतांना ग्रामिण भागात आजही पहायला मिळत आहे.

सालाबादप्रमाणे दरवर्षी पोळा या सनानिमीत्त एक महिना अगोदर शेतकरी राजा आपल्या शेताच्या एका कोपऱ्यात ज्वारीची व मकासारख्या पिकाची पेरणी करून कडवळ,बाटुक जाणावरांना खाऊ घालण्यासाठी लागवड करतात.पोळ्याच्या आदल्या दिवसापासुन हिरव्यागार चार्याने आपल्या लाडक्या बैलजोडीला भरपेट चारा खाऊ घालतात.त्यानंतर सायंकाळी आपल्या सर्जा राजाची खांदामळणी करून औक्षण करतात.

पोळा सणाच्या दिवशीही भल्या पहाटे शेतकरी उठून आपल्या सर्जा राजाच्या बैलजोडीला घेऊन त्यांना स्वच्छ धुण्यासाठी नदीकाठी घेऊन जातात.नदीच्या पाण्यात गेल्यानंतर त्यांना धुण्यासाठी अगदी स्वःता प्रमाणे साबन,शांपू वापरून अंघोळ घालतात.तेथुन घरी आल्यावर दिवसभर बैलजोड्याची सजावट करण्यात शेतकरी मग्ण झालेला असतो.गावातील पारंपारिक पध्दतीने हातमागावर बनविलेले कासरे,वेसनी,मोरक्या, रंगिबेरंगी गोंडे व मोठाले फुगे लावुन,शिंगाला रंग आपला बैल सर्वात अधिक उठून कसा दिसुन येईल याकडे अधिक लक्ष दिले जाते.

त्यानंतर सायंकाळ होण्याच्या दरम्यान मानाच्या बैलाचा मान झाल्यावरच गावातील शेतकरी आपल्या बैलजोडीला वेशितुन घेवुन मारोती मंदिराला प्रदक्षिणा घातल्या नंतर परत आपल्या घरी आणुन बैलजोडीला व घर मालकाला घरातील महिला मोठ्या उत्साहाने औक्षण करून बैलांना गोड गोड पुरणपोळीचा घास भरवण्यात येतो.बैलगाडी च्या जु ची पुजा करतात.नंतर परत बैलजोडीला मंदिरात घेऊन जातात व मारोती मंदिराला प्रदक्षिणा घालुन शेतकरी घरी येतो व दिवसभर धरलेला उपवास सोडतो.अशा पध्दतीने पोळा सन ग्रामिण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो.यामुळे यांञिकी करणाला फाटा देत आजही खेड्यात हि परंपरा पिढ्याणपिढ्या पासुन अखंड चालु राहिली आहे.
Loading…