राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 19 ते 25 मार्चपर्यंत संध्या. 7 ते सकाळ 6 वाजेपर्यंत संचारबंदी

संचारबंदी

परभणी – कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात दि.19 ते दि.25 मार्च पर्यंत संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी गुरूवारी जारी केले. तरीही जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे.

आज १६६ कोराेनाचे रुग्ण आढळले 

गुरूवारी 166 व्यक्ती कोरोनाबाधीत झाले. तर  शहरासह जिल्ह्यात गुरूवारी  6 वाजेपर्यंत 166 व्यक्ती कोरोनाबाधीत आढळल्या. कोरोनामुक्त 71 व्यक्तींना सुट्टी दिली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. रुग्णालयातील कक्षात 672 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 347 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 9 हजार 937 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 8 हजार 918 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 45 हजार 563 व्यक्तींचे नमुने तपासले. त्यात 1 लाख 35 हजार 46 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 9 हजार 784 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 593 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या –