राज्यात प्रत्येक शेतकऱ्याला खतांची उपलब्धता होईल, खतांचा तुटवडा जाणवणार नाही – कृषिमंत्री

दादा भुसे

मालेगाव – महाराष्ट्रात आत्तापर्यंत साधारणत: ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबिन बियाण्यांच्या माध्यमातून नुकसान झाले त्यांना कसा लाभ देता येईल, त्यासाठी शासन विचार करीत आहे. बागलाण तालुक्यात खते मिळत नसल्याबाबतचे कळताच कृषी विभागाला सांगून खते उपलब्ध करून देण्यात आली. सालाबादाच्या मागणीप्रमाणे रासायनिक खते, युरिया आणि इतर खतांची उपलब्धता केली आहे, मात्र कोरोनामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली तर खतांचा पुरवठा थोडा उशिरा होण्याची शक्यता आहे. परंतू प्रत्येक शेतकऱ्याला खतांची उपलब्धता होईल यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून ५० हजार मेट्रीक टनाचा बफर स्टॉक कृषी विभागाकडे ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेपेक्षा अधिक खतांचा साठा करू नये. तसेच बोगस बियाणांच्या तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. प्राप्त तक्रारींचा कृषी विभागामार्फत तात्काळ न्यायनिवाडा करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

बागलाण तालुक्यातील अंबासन फाट्यावरील मेंढपाळांच्या रहाटीला भेट देवून त्यांच्या समस्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जाणून घेतल्या. भेटी प्रसंगी मेंढपाळांच्या जित्राबावर ओढावलेल्या लंगड्या रोगाची समस्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दादा भुसे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

गुणवत्तापूर्ण बी-बियाणे आणि खते मिळावे यासाठी कृषी विभाग दक्ष – कृषीमंत्री

कऱ्हे येथील शेततळे व अस्तरीकरण पाहणी

‘मागेल त्याला शेततळे’ व राष्ट्रीय कृषी विकास योजना २०१९-२०२० अंतर्गत कऱ्हे, ता.सटाणा येथील अनिता मांडवडे या लाभार्थ्याच्या शेततळे व अस्तरीकरण याची पाहणी दादा भुसे यांनी केली. या योजनेतून सौ.अनिता मांडवडे यांना शेततळे खोदकामासाठी ५० हजार व शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरणासाठी ७५ हजार इतके अनुदान कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आले. पाणी उपलब्धतेमुळे आता कमी खर्चात अधिक उत्पादन त्या आपल्या शेतीक्षेत्रात घेत आहेत. कोरोनाच्या काळातही कृषी मंत्री यांनी शेताच्या बांधावर भेट देवून मार्गदर्शन केले असल्याने मांडवडे कुंटुबियांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव तरळत होते.

उर्वरित शेतकरी कर्जमाफीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा…

कृषी मंत्र्यांनी देवळा येथील बैठकीत खते व बियाणांच्या पुरवठ्याबाबत घेतला आढावा

देवळा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालविणाऱ्या दुकानदाराने त्यांच्याकडील उपलब्ध साठा व दर पत्रकाचा फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. ज्या दुकानात असा फलक लावलेला नसेल, त्याचा फोटो काढून पाठवा, अशा क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी देवळा येथील आढावा बैठकित सांगितले. तसेच देवळा तालुक्यातील खते व बियाण्यांचा लक्षांक पूर्ण करण्यात आला आहे. महिला शेती शाळेमुळे चूल व मूल या संकल्पनेतून महिला बाहेर पडताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाची धुरा सांभाळणाऱ्या महिला कृषी सहाय्यकांसह महिला शेतकऱ्यांचा सन्मानही यावेळी कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या –

आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना आता पीककर्जाबरोबर गायी-म्हशींसाठी ही मिळणार कर्ज

कर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश