निंबवृक्ष लागवड उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हा – बच्चू कडू

पालकमंत्री बच्चू कडू

अकोला – निंब वृक्षाच्या रोपाची लागवड करुन आपण आपला परिसर हिरवागार करु शकतो. त्याचे अनेक फायदे आपल्याला होतील. हे वृक्ष लागवड करुन त्यांची योग्य निगा राखण्याच्या या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी कुंभारी येथील ग्रामस्थांना केले.

कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण आहे, त्याला शोधलं पाहिजे – बच्चू कडू

कुंभारी येथील हनुमान ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते गणेश महाविद्यालय, कुंभारी येथे निंब वृक्ष रोपणचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री. कडू यांच्याहस्ते निंब वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी कुंभारीचे सरपंच संतोषकुमार भटकर, पंचायत समितीचे सदस्य विजय बाभुळकर, माजी आमदार तुकाराम बिडकर, तहसीलदार विजय लोखंडे, जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष नारायणराव गावंडे, माजी सरपंच बाळासाहेब अतकरी उपस्थित होते.

मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – अशोक चव्हाण

हनुमान ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत ५०० निंब वृक्षरोपण केले जाणार असून त्यांची सुरुवात गणेश महाविद्यालय, कुंभारी येथून करण्यात आली. निंब वृक्षरोपण अविरत सुरु राहण्यासाठी सामाजिक वनीकरण मार्फत वृक्षरोपणाकरिता पाणी व दोनशे झाडामागे एक मजूर याप्रमाणे तीन वर्षाकरिता उपलब्ध करुन देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी संबंधितांना दिले. मागील वर्षी लावण्यात आलेल्या निंबवृक्षाची पाहणी करुन त्याची निगा राखल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतूक केले.

शेगाव-नरनाळा-चिखलदारा पर्यटन सर्कल तयार करुन पर्यटकांना दोन-तीन दिवस मुक्कामी राहता येईल, अशा पद्धतीने पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासाठी गावातील रस्ता दुरुस्ती व अन्य महत्त्वाची कामे करण्याबाबत त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाला गणेश विद्यालय, कुंभारी येथील शिक्षक, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बच्चू कडू अॅक्शन मोडमध्ये, वेषांतर करून कृषी केंद्रावर नजर ठेवण्याचे दिले आदेश

पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकल वाटप

पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याहस्ते आज दिव्यांग लाभार्थ्यांना तिनचाकी सायकल वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दुपारी हा कार्यक्रम पार पडला. ज्ञानेश्वर रमेश ठाकरे व राहुल अरविंद शाह या दोन दिव्यांग लाभार्थ्यांस तीन चाकी सायकल वाटप करण्यात आली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

बच्चू कडू आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना सक्षमपणे उभी – एकनाथ शिंदे

उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश