एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांनी वाढणार का ‘या’ जिल्ह्याची सिंचन क्षमता ?

गडचिरोली – जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील तळोधी मोकासा व सिरोंचा येथील रेगुंठा उपसा सिंचन योजना पुर्ण करण्याकरीता पुरवणी मागणीद्वारे २७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी तसेच आमदार कृष्णा गजबे यांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्री यांचेकडे प्रश्न मार्गी लावण्याबाबत विचारणा केली होती.

केंद्र सरकार नवी योजना; शेती अवजारांसाठी देणार ८०% अनुदान, असा घ्या लाभ

गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त संवेदनशील जिल्हा असून ७८ टक्के वनक्षेत्र आहे. या जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी यापूर्वी चिंचडोह प्रकल्प मार्गी लागला असून कोटगल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर तळोधी मोकासा येथील उपसा सिंचन प्रकल्पाचे काम तसेच सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उपसा सिंचन प्रकल्पाचे काम गतीने पुर्ण करण्याचा दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना विनंती केली होती. त्याअनुषंगाने पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला.

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

त्याचे फलित म्हणून या दोन्ही प्रकल्पासाठी एकूण २७ कोटी रुपयांची तरतूद सन २0२0-२१ च्या पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे तळोधी मोकासा प्रकल्पातील १६ गावातील ६0६२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. तर रेगुंठामुळे १७ गावातील ३२८३ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या कामी पुढील लागणारा आवश्यक निधी टप्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी – राज्यात लवकरच तलाठी भरती होणार

1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी रेल्वेकडून डिसेंबरमध्ये परीक्षा