निर्यातक्षम पिकांची मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

नाशिक : निर्यातक्षम फळ व भाजीपाला अशा 15 प्रकारच्या पिकांची नोंदणी करण्यासाठी अपेडाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. याअंतर्गत 30 नोव्हेंबर 2017 पर्यत नोंदणी करण्याचेकरण्यात आले आहे. करावी. त्यासाठी ‘apeda farmer connect’ हे मोबाइल ॲप्लिकेशन तयार केले असून ते https://apeda.gov.in या संकेतस्थळावर व प्ले-स्टोअर उपलब्ध आहे. तसेच https://aaplesarkar.maharashtra.gov.in व कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील निर्यातक्षम फळ व भाजीपाला ऑन लाइन नोंदणी करता येईल. यामध्ये द्राक्ष, डाळींब, आंबा आदी फळबागा आणि भेंडी, कारले, भोपळा, तोंडले, मिरची, शेवगा, कढीपत्ता, गिलके आदी 15 भाजीपाला पिकांची शेतकऱ्यांनी नोंद करावी. सन 2017-18 मध्ये जिल्ह्यातील द्राक्षबाग नोंदणीसाठी ठरवलेल्या 60 हजार प्लॉट पैकी फक्त 260 लाभार्थ्यांनी द्राक्षबागांची नोंदणी केली आहे.

मागील वर्षी ग्रेपनेट वर 34110 द्राक्षबागा नोंद झाल्या होत्या. अधिक माहितीसाठी व तांत्रिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी अथवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि अधिकारी अभिजीत घुमरे मो.क्र. 7588016424 व कृषि सहाय्यक कुणाल पाटकर मो.क्र. 8275584589 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक यांनी केले आहे.