कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी स्वॅब चाचणी वाढवा – ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार – जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांची स्वॅब तपासणी करून कोरोना संपर्क साखळी तोडण्याचा प्रयत्न करावा, तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी आजाराची प्राथमिक लक्षणे असतानाच स्वॅब तपासणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.

गुळाचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ॲड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब सुरु झाल्यामुळे जास्तीत जास्त स्वॅब तपासणीसाठी फिरत्या पथकांची व्यवस्था करावी. आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरित उपचार सुरू करण्यात यावे. नागरिकांनीदेखील लक्षणे आढळल्यास वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी. खाजगी कोविड रुग्णालयात शासकीय दरानेच सेवा दिली जाईल व नियमांचे पालन होईल यांची संबंधितांनी दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालय वाढीव दराने बिल देत असल्याच्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना बाधित व्यक्तिंची संख्या सातत्याने वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यामातून सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. विशेषत: ग्रामीण भागात नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर केला पाहिजे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, घराबाहेर पडल्यावर शारिरीक अंतर राखावे व हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझर लावावे. अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘हे’ आहेत योग्य आहार, जाणून घ्या

खावटी योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करा

राज्य शासनामार्फत ११ लाख ५५ हजार कुटुंबांना खावटी अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वंचित आदिवासी बांधवांची माहिती संकलित करण्यात यावी. योजनेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी. शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना शिधापत्रिका देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीत नवापूर, शहादा, चिंचपाडा तसेच अक्कलकुवा येथे कोविड रुग्णासाठी कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत तसेच सुरक्षा व्यवस्था, रोजगार हमी योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली, खरीप पीक कर्ज, वनदावे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस प्रातांधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

मोड आलेले मूग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या