१५ सप्टेंबरपर्यंत पीककर्ज वाटपासाठी मुदतवाढ

नगर – खरीपातील पीककर्ज वाटपासाठी बॅंकेने आजपर्यंत (ता ३ सप्टेंबर )मुदत दिली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीवरून बॅंकेने पीककर्ज वाटपाची आता मुदतवाढ १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती बॅंकचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कडून देण्यात आली.

पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीककर्जासाठी जिल्हा बॅंकेकडे कर्जाची मागणी होत असल्याचं दिसत आहे. बॅंकेने सेवा सोसायट्यामार्फत पुरवणी कर्जमागणीस मंजुरी दिली आहे. अद्याप अनेक शेतकरी सभासदांनी कर्ज उचल केली नसल्याने, त्यांची पीककर्जाची मागणी येत असल्याचं दिसत आहे.

चिंच खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

नगर भागातील शेतकरी खरीप पिकाची तयारी करत असून, पीक कर्जपुरवठा सुरळीत सुरू आहे. शासनाने चालू खरीप हंगामात १४९८ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. ते पूर्ण करून बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप केले आहे.

दरम्यान, आज रोजी बॅंकेने कडून  १६३५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात ठेवण्यात आलेले उद्दिष्ठापैकी सर्वाधिक जिल्हा बॅंकेने कर्जवाटप केले आहे. बॅंकेने कर्जवाटपास दिलेल्या मुदतीचा लाभ शेतकऱ्यांनी लवकरात लवकर घ्या असे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज

‘ही’ भाजी खाणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते, जाणून घ्या फायदे