राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा

पाऊस

राज्यातील बहुतांश भागात जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. तर पुढील काही दिवस राज्यात भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेन्ज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे राज्यात येत्या 4, 5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळं ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

हवामान विभागाकडून आज 12 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला यलो अलर्ट दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –