निकृष्ट बीटी बियाण्यांसाठी भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे फडणवीस यांनी जाहीर करावीत – विजय जावंधिया

विजय जावंधिया

नागपूर – शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला ‘कृषी प्रधान’ देश म्हटले जातात. परंतु याच देशामध्ये शेतकऱ्यांचे खुप हाल होत असताना दिसत आहे.

कृषी व सिंचन क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे विकासाला गती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी थेट आव्हान फडणवीस यांना केले की, आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी बियाण्यांपोटी शेतकऱ्यांना कंपन्यांकडून १४ ते १८ लाख रुपयांची भरपाई देण्यात आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला होता. हा दावा खरा असेल, तर भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची आणि ती देणाऱ्या कंपन्यांची नावे जाहीर करावीत.

समुद्रात जाणारे पाणी वळवून नगर-नाशिक जिल्ह्यातील वाद मिटवणार – देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकृष्ट बियाण्यांबाबत राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावेळी फडणवीस म्हणाले होते की, निकृष्ट बियाण्यांचा पुरवठा झाल्याने सोयाबीनच्या उगवणविषयक तक्रारी वाढल्या. आज त्यांची संख्या तीस हजारांवर पोचली आहे. आता दुबार पेरणीकरिता पैशाची सोय करण्याची शेतकऱ्यांची विवंचना अधिकच वाढली आहे. तसेच निकृष्ट बियाणे प्रकरणात आपल्या सरकारने २०१८ मध्ये बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना १४ ते १८ लाख रुपयांची भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता, असा दावाही त्यांनी केला होता.

जलसंवर्धन हे जनआंदोलन होण्यास ‘मन की बात’ मुळे गती मिळेल – देवेंद्र फडणवीस

याच मुद्यावर विजय जावंधिया यांनी पत्राद्वारे त्यांना विचारणा केली की, ज्या शेतकऱ्यांना निकृष्ट बीटी बियाण्यांसाठी भरपाई देण्यात आली, त्यांची व भरपाई देणाऱ्या कंपन्यांच्या नावांबाबत जावंधिया यांनी माहिती मागितली.

महत्वाच्या बातम्या –

पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं – आ. रवी राणा

मराठा आरक्षणाच्या निकालावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद

झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटपाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री