शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर कोणीही बोलायला तयार नाही – पुष्पा भावे

टीम महाराष्ट्र देशा- एकीकडे स्वच्छतेविषयी जाहिराती यायला लागल्या. दुसरीकडे मात्र शेतकर्‍यांचे प्रश्‍न यावर कुणीही बोलायला तयार नाही. शेतकर्‍यांचे प्रश्‍न ऐरणीवरच असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ता, लेखिका पुष्पा भावे यांनी व्यक्‍त केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि. 4) मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उल्‍लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते, लेखिका पुष्पा भावे यांना अनंत भालेराव स्मृतिपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढे बोलताना भावे म्हणाल्या की, शेतकर्‍यांचे प्रश्‍न ऐरणीवर असले तरी त्याची चेष्टाच आज केली जात आहे. ते सोडविण्यासाठी कुणीही तयार नाही. याशिवाय त्या मराठा मोर्चाविषयी बोलताना म्हणाल्या की, मराठा मोर्चे अनेक निघाले, परंतु या मोर्चाचे काय झाले यावर कुणीही बोलायला तयार नाही.

मागण्या मागणार्‍यांशी कुणी बोलत आहे की नाही, की नुसतेच मोर्चे काढले जात आहे. असा प्रश्‍न उपस्थित केला. याशिवाय नरेंद्र मोदी हे नेहरू होऊ पाहत आहे. नेहरूसारखेच ते कार्य करत आहे. याशिवाय नेहरूंनी जे चांगले केले तेही ते करत आहेत. इतकेच नव्हे तर जीएसटी यावर मध्यरात्री सभा नरेंद्र मोदी यांनी घेतली. ही सभा मध्यरात्री का? या प्रश्‍नाचे उत्तर कोणी शोधायला तयार नाही. परंतु नेहरूजींनी त्याकाळी मध्यरात्री सभा घेतली होती. म्हणून मोदींनीह मध्यरात्री सभा घेतली, असे स्पष्ट मत पुष्पा भावे यांनी यावेळी व्यक्‍त केली. या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक डॉ. सविता पानट यांनी केले. अज्ञात क्रांतीकारकांना हुडकून काढा मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचा लढा गावागावात लढला गेला. यात शेकडो जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्मारक समितीने 24 जणांची नावे या ठिकाणी शोधून काढली. लिहिली आहेत, अजूनही असंख्य हुतात्मे काळाच्या पडद्याआड आहेत. त्यांनाही स्मारक समितीने हुडकून काढावे, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.