हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्याने केली ‘अफू’ची शेती; दीड हजार झाले जप्त

‘अफू’ची शेती

हिंगोली जिल्ह्यातील खाडा बाळापूर मधील भोसी शिवारामध्ये कांदा व लसणाच्या पिकात शेतकरी रामदास गमाजी खोकले यांनी अफूची झाडे लावली होती. खोकले यांच्या शेतात अफूची दीड हजार झाडे आढळून आली. दरम्यान, पोलिस येत असल्याची माहिती मिळताच रामदास खोकले फरार झाले.

पोलिसांनी शेतातील ती झाडे उपटून पोलिस ठाण्यात आणली आहेत. या झाडांची बोंडे तोडून त्याचे वजन केले असता साडेचार किलो वजन भरले. या प्रकरणात पोलिसांनी रामदास खोकले यांचा शोध सुरू केला असून त्याच्या अटकेनंतरच अफूच्या शेतीबाबत आणि इतर कोणी सहभागी होते का ? याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आनंदाची बातमी : कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता

या बद्दलची अधिक माहिती अशी की, भोसी शिवारात अफूची शेती होत असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विकास थोरात, जमादार शेख बाबर, गजानन भालेराव, संजय मार्के, प्रभाकर भोंग, मंडळ अधिकारी रंगनाथ सावंत यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी ही झाडे सुमारे तीन ते चार फूट उंचीची झालेली होती तसेच  सर्व झाडांना बोंडेदेखील लागली होती.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्याला लुटणारे आरोपी अवघ्या १२ तासात जेरबंद

पुणतांब्यातील कृषीकन्येच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी; आंदोलनही तूर्तास मागे

मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये थंडी ओसरली तर अमरावती, गोंदिया आणि नागपूर येथे पाऊस