धर्मा पाटील मृत्युप्रकरण : काँग्रेस, शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

धुळे: जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात फे-या मारणारे धर्मा पाटील निधन अखेर निधन झाले. मात्र त्यांच्या निधनाला सरकार जबाबदार असल्याचे सांगत काँग्रेस व शिवसेनेने धुळ्यातील दोंडाईचा-विखरण रस्त्यावर निषेधार्थ रास्तारोको आंदोलन केले.दरम्यान,धर्मा पाटील यांच्या जाण्याने संपूर्ण विखरण गाव सुन्न झाले असून त्यांना आणि इतर प्रकल्प बाधितांना तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

संपूर्ण गाव हे पाटील कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जो पर्यंत धर्मा पाटील यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा विखरण मधील प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांनी दिला आहे.