दुष्काळ व कर्जाला कंटाळून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही आकड्यांची गरज नाही. देशातील सर्वाधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्या कृषिक्षेत्राच्या दारुण स्थितीला महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे सरकारची कृषिवषयक धोरणे. या धोरणांमधून कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या मुख्य समस्यांना बगल दिली जात आहे. तर दुसरीकडे फक्त कर्जमाफीसारख्या योजना आणून शेतकऱ्यांचे सरकारवरचे अवलंबित्व वाढविले जात आहे, हे भयानक आहे.

बाधित जिल्ह्यांसाठी आणखी एक हजार कोटी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

शेतकरी हा कर्ज घेऊन त्याच्या शेतात पीक घेतो आणि त्यावर जर अशी नैसर्गिक आपत्ती आली की तो फार खचून जातो. कारण त्याने कर्ज घेतलेले असते आणि त्यात या आपत्ती मुळे तो कर्जबाजारी होतो.

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

अशीच एक घटना ही वर्धा जिल्ह्यात झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील आरंभा येथील तरुण शेतकरी राजु रामभाऊ नांदे (वय 37) याने कर्जाला कंटाळून स्वताच्या शेतात विष प्राशन केले. त्यावेळी त्या शेतकऱ्याला उपचारासाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले पण मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्याचा अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

त्यांच्याकडे एक हेक्टर एक आर शेत जमीन आहे. ह्या शेतीच्या माध्यमातून तो आपल्या संसार पाहत होता. मात्र दर वर्षी शेतीवर येत असलेले विविध संकट त्यातच या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने पीक गेल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. त्याच्यावर भारतीय स्टेट बँकेचे 70 हजार व खाजगी असलेले हे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तो नेहमी असायचा असे त्यांच्या कुटुंबीयांनकडुन सांगण्यात येते आहे.

महत्वाच्या बातम्या –

चांगली बातमी ; शेतीमालाची निर्यात दुप्पट करण्यासाठी सुकाणू अन् क्लस्टर फॅसिलिटेशन सेलची स्थापना

नागपूरच्या विशाल मेगा मार्टमधून बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त