शेतकरी मित्रांनो, हिवाळ्यात ‘ही’ पिके घेतली तर मिळेल भरघोस उत्पन्न

भाजीपाला लागवड

गेल्या काही वर्षांपासून भारत हा भाजीपाला उत्पादक देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. कारण देशातील विविध भागात पिकलेल्या भाज्यांची परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. याचे सर्व श्रेय भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला जाते. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवले आहेत. पण भाज्या या खरीहंगामापेक्षा हिवाळ्यात जास्त चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतात. या कालावधीत शेतकऱ्यांना भाजीपाला कमी वेळेत जास्त फायदा मिळवून देऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने कोणत्या भाज्यांचा समावेश होतो जाणून घेऊया :

  • बटाटा

बटाटा ही रब्बी हंगामातील प्रमुख भाजी आहे. बटाटा एक जमिनीच्या आत उगवली जाणारी भाजी आहे ज्याची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्याला खोल नांगरणी करून शेत तयार करावे लागते. त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी मुबलक प्रमाणात खत टाकून बियाणे पेरले जाते.

  • मटार

मटार हे हिवाळ्यात भरपूर उत्पादन देऊ शकते कारण मटार पेरण्याची योग्य वेळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत असते. मटार हे रब्बी हंगामातील मुख्य भाजीपाला पीक आहे. भारतात काही भागांमध्ये वर्षभर मटारची लागवड केली जाते पण हिवाळा हा मटारच्या लागवडीसाठी उत्तम हंगाम आहे.

  • लसूण

स्वयंपाक घरात वर्षभर वापरल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये लसणाचा समावेश होतो. त्यामुळे शेतकऱ्याला लसूण भरघोस उत्पन्न देते. पेरणीसाठी हेक्‍टरी 500 ते 700 किलो लसणाचे बियाणे पुरेसे असते. भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी पंक्ती पद्धतीने लसूण पेरावा.

  • कोबी

किनारपट्टी पासून डोंगराळ भागापर्यंत कोबीची लागवड केली जाते. कोबीच्या विविध जातींच्या बियाणांपासून रोप तयार करून कोबीची रोपे लावली जातात. या पिकापासून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी कंपोस्ट आधारित सेंद्रिय शेती करता येते.

  • शिमला मिरची

हिवाळा येताच शिमला मिरचीच्या उत्पादनात वाढ होते. कारण हिवाळ्यात शिमला मिरचीची मागणी भरपूर असते. शिमला मिरचीच्या बियाण्यांपासून रोपवाटिका तयार केल्यानंतर वीस दिवसांनी त्याची रोपे लावली जातात. चांगल्या उत्पादनासाठी शिमला मिरची लावणी केल्यानंतर त्याला 25 दिवसांनी 25 किलो युरिया द्यावा. त्यामुळे शिमला मिरचीच्या उत्पादनात अधिक भर पडू शकते.

महत्वाच्या बातम्या –