नांदेड : काळजाला पिळवटून टाकणारी घटना नांदेड मध्ये घडलीये. महारष्ट्रातील शेतकऱ्यांची खस्ता हालत आता त्याच्या परीजानांचे कसे जीव घेते याचं धक्कादाय उदाहरण पुन्हा महाराष्ट्राच्या समोर आहे. बापाच्या कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्याच्या मुलीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. पुजा शिरगिरे असं या मुलीचं नाव आहे.
आपल्या लग्नासाठी हुंडा देण्याची बापाची ऐपत नसल्याची चिंता पुजाला सतावत होती. आधीच कर्जबाजारी आणि त्यात लेकीच्या लग्नाचा खर्च अशी दुहेरी चिंता… हे बापच दुखः पुजाला पाहवल नाही आणि आपल्यामुळे आपल्या बापाला त्रास नको म्हणून पुजानं हे पाऊल उचललं. सुसाईड नोटमध्ये तीनं या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.
You must be logged in to post a comment.